सोलापुरातील डिजिटल बोर्ड संदर्भात महापालिका आयुक्तांनी घेतले हे निर्णय

0
10

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील होर्डिंग, फ्लेक्स परवानगी बाबत काल महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांनी बैठक घेतली होती. त्या अनुषंगाने आज सोलापूर शहरातील फ्लेक्स प्रिंटिंग असोसिएशन यांची मीटिंग आयुक्त यांच्या दालनामध्ये घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, शिवराज झुंजे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील अनधिकृत होर्डिंग ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्यांनी तीन दिवसाच्या आत काढून घ्यावे अन्यथा सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत कारवाई करण्यात येईल.

सोलापूर शहरात फ्लेक्स डिजिटल लावण्याकरिता लवकरच जागा निश्चिती करून त्याची महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्धी करण्यात येईल. प्रिंटर्स असोसिएशन यांनी होर्डिंग फ्लेक्स लावण्याकरिता नागरिकांना मदत करण्याबाबत महापालिका आयुक्त शितल तेली -उगले यांनी आवाहन केले.

सोलापूर शहरातील 1)डाक बंगला व सात रस्ता परिसर 2) रेल्वे स्टेशनपरिसर 3)भैय्या चौक 4)छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी स्टॅन्ड 5)सम्राट चौक ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) उद्यान परिसर 6)टिळक चौक परिसर 7)अशोक चौक परिसर 8)चार पुतळा परिसर 9)डफरीन चौक कै. शंकरराव चव्हाण पुतळा परिसर,10)डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर ( पार्क चौक ) या ठिकाणी नोट डिजिटल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांनी डिजिटल फ्लेक्स लावू नये अन्यथा त्यांच्यावरती कायद्यातील तरतुदी प्रमाणे गुन्हे दाखल करणेत येतील असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.