सोलापूर : न्यू पाच्चा पेठ येथील ईस्ट हाइट अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील घराच्या दरवाजाचे कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .
यामध्ये 75 हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, बारा हजारांची कानातील कर्णफुले, अडीच हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा ऐवज असल्याचे श्रीनिवास बत्तीन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर मोतेकर अधिक तपास करीत आहेत.