येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ शहराजवळील कोळेगाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी 11 वाजता लुना वर बसलेल्या पती-पत्नीस एका मोटारीने जोरदार धडक दिल्यामुळे राधा जनार्धन मोटे या 39 वर्षांच्या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे .या अपघातात जनार्दन मोटे हे जखमी झाले असून हे दोघेही नरखेड चे रहिवासी आहेत. मोटे पती -पत्नी मोहोळ कडून सोलापूरच्या दिशेने निघाले होते . एम एच बारा/ एनबी 3196 या मोटारीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. जनार्दन मोटे यांना सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.