सोलापूर : रोटरीची अन्नपूर्णा योजना म्हणजे सत्पात्री दानाचे उत्तम उदाहरण असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सोमवारी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अन्नपूर्णा योजनेला १८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ड्रीम पॅलेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुयश गुरुकुलचे केशव शिंदे उपस्थित होते. यावेळी मंचावर अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश फोफलिया, अन्नपूर्णा योजनेचे समिती प्रमुख ब्रिजकुमार गोयदानी उपस्थित होते.
राेटरी अन्नपूर्णा याेजनेद्वारे राेटरी क्लब ऑफ साेलापूरनेे १०० वृध्दांना आधार दिला आहे . आणि हे कार्य खरेच वाखाणण्याजाेगे असून राेटरीच्या सामाजिक सेवेच्या बांधिलकीचे प्रतिक असल्याचे केशव शिंदे यांनी सांगितले.एखादी याेजना १८ वर्षे अव्याहतपणे चालू ठेवण्याचे राेटरी क्लब ऑफ साेलापूरचे हे कार्य खरेच काैतुकास्पद असल्याचे गाैरवाेद्गार त्यांनी काढले.
रोटरी क्लब अध्यक्ष धनश्री केळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूरची माहिती सांगितली तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
ब्रिजकुमार गोयदानी यांनी राेटरी अन्नपूर्णा याेजनेचा आढावा घेतला.
ही याेजना गेली १८ वर्षे चालवणार्या उद्याेगवर्धिनी बचत गटाच्या संचालिका चंद्रिकाताई चौहान, गीतांजली चौहान तसेच रिक्षाचालक शरणय्या हिरेमठ, राम चौगुले यांच्या दैनंदिन उत्स्फूर्त सहभागामुळे आणि समर्पित सेवेमुळे गेली १८ वर्षे एकही दिवसाचा खंड न पडता चालू असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या याेजनेला दानशूर व्यक्तिंचा आर्थिक हातभार दरवर्षी मिळत आहे. अन्नपूर्णा याेजनेने आज साेलापूरात नव्हे तर भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलाैकिक मिळवला आहे. ९,१०० रुपये देणगी दिल्यास एका व्यक्तीचे वर्षभरासाठी पालकत्व देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इच्छुकांनी राेटरी क्लब ऑफ साेलापूरच्या सदस्यांशी अवश्य संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
राेटरी क्लबचे सचिव निलेश फोफलिया यांनी आभार प्रदर्शन केले तर संदीप जव्हेरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माजी अध्यक्ष सी.ए. राज मिणियार यांनी सूत्रसंचलन केले. या साेहळ्यात प्रत्येक लाभार्थ्यांना ब्रिजकुमार गाेयदानी यांच्यातर्फे टॉवेल आणि स्लिम हेल्थ क्लब यांच्यातर्फे बॅग भेट देण्यात आली. आनंद गुंड्याल यांनी सर्वांना कुल्फी खाऊ घातली ह्या सर्व लाभार्थ्यांना रोटरी चे सदस्य स्वतःच्या गाडीत आणले व सोडले. आजच्या १८ व्या वर्षपूर्ती सोहळ्याचा संपूर्ण खर्च रोटे. राजगोपाल मिणियार यांच्यातर्फे करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरीचे प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल, सुनील माहेश्वरी, खुशाल देढीया, पारुल पटेल, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. सोनाली वळसंगकर कालिदास जाजू, पराग कुलकर्णी, भूपती गुंडेली, श्रीकृष्ण गलगली, भरत अय्यंगार, सुहास लाहोटी, शांता येळंबकर, आशिष मेहता, संतोष कणेकर, सौ. लक्ष्मी मिनियार, सौ. तोरल पंचमिया, सौ. प्रांजल डागा, सौ. कांचन लाहोटी , हरीश गुप्ता, मितेश पंचमीया, सूरज तापडिया, प्रशांत सिंगी, सुनिल डागा सह अनेक रोटरी सदस्य आणि समाजातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.






















