द्वारका नगर मधील समस्या या माजी नगरसेवकांनी सोडवल्या…

0
31

सोलापूर: सर्व परिसरातील द्वारका नगर मध्ये पावसाने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले असून या बाबत नगरातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका व झोन कार्यालय यांना पाठपुरावा केला होता. परंतु कोणीतेच अधिकारी दखल घेत नव्हते. सदर बाबत नगरातील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना वरील समस्या सांगितल्या नंतर तातडीने सदर नगर मध्ये मुरूमची व्यवस्था करून दिल्याने तेथील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेविका म्हणून समजले होते परंतु प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आला अशा नागरिकाच्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो. तसेच नगरसेवकांचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा प्रत्यक्ष पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडवीत आहेत गौरवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्या..