महाराष्ट्र शासनाने जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यामुळे सोलापुरात लिंगायत समाजाच्यावतीने जल्लोष करण्यात आला

0
48

सोलापूर शहरातील कोतंम चौकातील महात्मा बसवेश्वर सर्कल येथे महात्मा बसवण्णा यांच्या पुतळ्यास लिंगायत समाजाचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शासनाचे अभिनंदन व आभार मानले. लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त केले. यावेळी फटाकेची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे,महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सचिन शिवशक्ती,लिंगायत समन्वय समितीचे शहर अध्यक्ष सकलेश बाबुळगावकर, नागेश हत्तुरे, जागतिक लिंगायत महासभेचे मल्लिकार्जुन मुलगे,लिंगायत माळी महासंघाचे नामदेव फुलारी,बसव ब्रिगेडचे बसवराज चाकाई,धनराज मैंदर्गी,ज्येष्ठ नेते केदार म्हमाने,युवा नेते अप्पू यलशेट्टी,शिवराज विभुते, चेतन म्हमाने,तम्मा झुंजे, लिंगायत महासंघाचे शहराध्यक्ष सचिन तूगावे, विजय भावे,नागेश पडनुरे, संतोष पाटील आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.