जागतिक अवयवदान दिनानिमित्त सोलापुरामध्ये महारॅलीचे १४ ऑगस्ट रोजी आयोजन

0
26

मानवी अवयवदान जनजागृती अभियानाबाबत मा.ना. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान, भारत सरकार यांच्या आदेशान्वये तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने कार्यवाही सुरु केलेली आहे. आता सन २०२३ मध्ये मा.ना. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, मा.ना.अजितजी पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा.ना. गिरीषजी महाजन, मा.ना. हसनजी मुश्रीफ यांनी मानवी अवयवांची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान चालू केलेले आहे. या अभियानाची फलश्रुती म्हणजेच मागील तीन वर्षात अवयवदात्यांची संख्या वाढून देशांतर्गत महाराष्ट्राचा अवयवदानामध्ये द्वितीय क्रमांक आला. केंद्र सरकारने त्यासाठी महाराष्ट्र शासनाला सन्मानित केले आहे. त्यामुळे मागील तीन वर्षात १७५ अवयवदात्यांनी अवयवदान केले आहे. प्रत्येक व्यक्तीने अनेक अवयवदान केल्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले आहे.

संपूर्ण भारतात अवयवदानाचे महत्त्व व त्याची चळवळ उभी राहणे ही काळाची गरज आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात अवयवदानाचे प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. देशात अवयवदानाचे प्रमाण १० लाख लोकांमागे ०.०८ एवढेच आहे. इंग्लंडमध्ये हे प्रमाण १४.८ आहे. अमेरिकेत २६.३ इतके आहे. स्पेनमध्ये जगात सर्वाधिक म्हणजे ३४.२ इतके आहे. हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या भारतात ५०,००० असून प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाण फक्त १५०० आहे. ३०,००० यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना १,५०० जणांना यकृत प्रत्यारोपण केले जाते. २,००,००० मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असताना प्रत्यक्ष प्रत्यारोपण ६,००० इतके आहे. तर ३०,००,००० डोळे प्रत्यारोपणाची गरज असताना प्रत्यक्ष प्रत्यारोपण १,५०,००० इतके होत असल्याचे वरील आकडेवारीवरुन दिसून येते. अवयवदानाबाबतचा कायदा, त्याच्या तरतुदी व फायदे यांची फारशी माहिती जनमानसात नसल्याने देशात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. अवयवदानासंबंधी गैरसमज व अज्ञान दूर करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होणे गरजेचे आहे. बहुतांश साक्षर व सुशिक्षित वर्गातसुध्दा याबाबत जागरुकता दिसून येत नाही.

मानवी अवयव तस्करी व काळाबाजार थांबविण्यासाठी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ संमत केला. त्याअन्वये मानवी अवयव प्रत्यारोपणास कायदेशीर परवानगी दिली आहे. या कायद्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करुन मानवी अवयवांची तस्करी ‘थांबविण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा अंतर्भाव केला आहे.

अवयवदानाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषंगाने दि. १३ ऑगस्ट २०२३ हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक अवयवदान दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय य श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कुंभारी, अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर.