पंढरपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला पंढरपूरात आज श्री विठूमाऊली आणि रखुमाईचा गाभा-याला हापूस आंब्याची आरास केली आहे. सावळा विठ्ठल आमराईत असल्याचे आज दिसत आहे.
आज अक्षयतृतीया असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस आंब्याची आरास केली आहे. प्रत्येक सणा निमित्त फुलांची सजावट करतात. पण सध्या आंब्याचे दिवस असल्याने सजावट करण्यासाठी आंब्याचा उपयोग केला आहे.
पुणे येथील विठ्ठलाचे भक्त श्री विनायकशेठ काची(बुंदेले) यांच्याकडून हि आरास करण्यात आली असून संपूर्ण सजावट मे. किसन सिताराम आणि ब्रदर्स पुणे यांच्याकडून साकारण्यात आली आहे. सावळया विठूरायाचे रूप आमराई मुळे अधिकच लोभस दिसत आहे.





