• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेल्वे विभागाने तापमान संतुलित राखण्यासाठी साकारले मियावॉकी जंगल

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2023
in इतर घडामोडी
0
रेल्वे विभागाने तापमान संतुलित राखण्यासाठी साकारले मियावॉकी जंगल
0
SHARES
1
VIEWS

देशी वृक्ष संवर्धनचळवळीला प्राधान्य देण्यासाठी उचलले सकारात्मक पाऊल

  • सोलापूर – वाढत्या सिंमेटच्या जंगलाच्या पार्शवभूमीवर तापमानाचे संतुलन राखण्यासाठी ‘मियावॉकी’ जंगलाची कल्पना सध्या रूढ होताना दिसत आहे. वन विभागापाठोपाठ रेल्वे विभागानेही सोलापूर विभागातील पहिले मियावाँकी जंगल रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या जागेत साकारले आहे. देशी वृक्ष लागवडीच्या चळवळीला प्राधान्य देत रेल्वे विभागाची पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल घेतले आहे.
  • वाढत्या सिंमेटच्या जंगलामुळे वाढणारे जागतिक तापमान रोखण्यासाठी मियावॉकी हा एक उत्कृष्ट पर्याय समोर येत आहे. कमी वेळेत, कमी जागेत मोठी वाढ होणारा जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करणारा हा जंगल प्रकार आहे. वन विभागाने सिद्धेश्वर वन विहारात उभारलेल्या मियावॉकीचा आदर्श घेत रेल्वे विभागानेही पुढाकार घेऊन मियावॉकी जंगल तयार केले आहे. अवघ्या आठ महिन्यात हे जंगल दहा फुटांहून अधिक उंच झाले असून यातील अनेक झाडांना फळे आणू फुले लागली आहेत. पुढील पाऊल उचलत रेल्वे विभागाने याच ठिकाणी आणखी ७०० चौरस मीटर जागेत मियावाँकी पद्धतीने झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. लवकर बार्शी, कुर्डुवाडी व पंढरपूर येथेही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
  • काय आहे मियावाँकी ?
    मियावाँकी ही मानवनिर्मित तापमान जंगलपद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्ती जास्ती देशी वृक्षांची लागवड केली जाते. एका चौरस मीटर जागेत तीन झाडे साधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे उंच, मध्यम लहान अशा प्रकारचे ४५ ते ५५ विविध जातीची झाडे लावली जातात. सूर्यप्रकाशाच्या स्पर्धेसाठी त्याची वाढ झपाट्याने होते.
  • सोलापूर शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था व व्यक्ती यांचे मार्गदर्शन, रेल्वे व लोकसहभागातून रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या जागेत २२५ चौरस मीटर जागेवर मियावाँकी जंगल तयार केले आहे. ५ जून २०२२ रोजी हे वृक्षारोपण करण्यात आले. सुरवातीला या जागा खोदून रेल्वे कॉलनीच्या ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले कंपोस्ट, बगॅस, कोकोपीट व काळी माती वापरून बेड तयार करण्यात आले. यावर मियावाँकी पद्धतीने ५५ प्रकारच्या देशी प्रजातीची रापे लावण्यात आली. सर्व रोपे एकाचवेळी न लावता शास्त्रीय पद्धतीने सुमारे तीन आठवड्यात लावण्यात आली. वड पिंपळ, कडुनिंब, कदंब, साग, शेवगा, तुळस, पपई, केळी या देशी प्रजातीची लागवड करण्यात आली असून अवघ्या आठ महिन्यात आज दहा फुट उंचीचे जंगल तयार झाले आहे.
  • रेल्वेच्या जागेवर पर्यावरणप्रेमींच्या मार्गदर्शनाने व रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे मियावॉकी जंगल तयार करण्यात आले. जय हिंद शुगर बगॅस व माऊली फाउंडेशन रोपे देऊन सहकार्य केले. सीएसआर फंडातून लवकरच वाडी (कर्नाटक), पंढरपूर, बार्शी, कुर्डुवाडीत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम यांनी या वनाबाबत सांगितले.
  • या मियावॉकी जंगलात फेरफटका मारण्यासाठी काल पर्यावरणप्रेमींची एकच गर्दी झाली होती. यावेळी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली सरानी उपस्थिताना मार्गदर्शन केले व विविध पर्यावरणीय संस्थांना उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले.
Previous Post

सोलापुरातील संत निरंकारी परिवारातर्फे संभाजी तलाव जलपर्णी स्वच्छता मोहिम सेवा संपन्न

Next Post

लाखो रुपये खर्च करूनही पंढरपुरातील चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छच असल्याने वारकरी वर्गात नाराजी

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
लाखो रुपये खर्च करूनही पंढरपुरातील चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छच असल्याने वारकरी वर्गात नाराजी

लाखो रुपये खर्च करूनही पंढरपुरातील चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छच असल्याने वारकरी वर्गात नाराजी

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026