• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झोपडपट्टी पुनर्विकास आणि कामगारांच्या चाळी व सोसायटींचा ‘बी टू’ चा प्रश्न लागणार मार्गी…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2025
in इतर घडामोडी
0
झोपडपट्टी पुनर्विकास आणि कामगारांच्या चाळी व सोसायटींचा ‘बी टू’ चा प्रश्न लागणार मार्गी…
0
SHARES
0
VIEWS

प्रस्ताव देण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना : आमदार देवेंद्र कोठे यांचा पुढाकार

सोलापूर – सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी व सोसायटीवर असलेल्या बी टू (सत्ता प्रकार – २ ब) चा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे मिळण्यासाठी आणि कामगार चाळी आणि सोसायटींवर असलेल्या बी टू (सत्ता प्रकार – २ ब) नियम माफ करण्याबाबत प्रस्ताव पाठवा. शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना केली.

सोलापूर शहरात असलेल्या २२० झोपडपट्ट्यांपैकी शहर मध्य मतदारसंघात १०२ झोपडपट्ट्या आहेत. यातील ५० झोपडपट्ट्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत तर इतर झोपडपट्ट्या खासगी जागेवर आहेत. या ठिकाणी पक्की घरे नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्यात बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दुर्घटना घडल्यामुळे शालेय विद्यार्थिनींना प्राणास मुकावे लागले होते. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील २० लाख कुटुंबांना पक्की घरे देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर झोपडपट्टीमुक्त करणे शक्य होणार आहे.

त्याचबरोबर सोलापूर शहरातील जुनी मिल चाळ, जुनी पोलीस लाईन, धरमसी लाईन, मुरारजी पेठेतील नरसिंग गिरजी चाळ, वारद चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ त्याचबरोबर अन्य कामगारांच्या चाळी तसेच मुरारजी पेठ, कर्णिक नगर, एकता नगर, गुरुनानक नगर आणि इतर सोसायटींवर बी टू (सत्ता प्रकार – २ ब) नियम असल्याने येथील विकासाला बाधा येत आहे. शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा नियम माफ केल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याकरिता सोलापूरसाठी हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

त्यावर याबाबत प्रस्ताव द्या, मुंबईत बैठक लावून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले.

महापालिका आयुक्तांनाही आमदार देवेंद्र कोठे यांचे पत्र

झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास प्रधानमंत्री आवास योजना २.० शहरी अंतर्गत परवडणारी घरे (एएचपी ) घटकांतर्गत प्राधान्यक्रमाने ज्या झोपडपट्ट्यांमध्ये दाट लोकवस्ती आहे, पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण येते, जिथे आपत्कालीन रहदारीस सहज मार्ग उपलब्ध होत नाही अशा झोपडपट्ट्यांचा प्राधान्याने विचार करून प्रायोगिक तत्त्वावर पुनर्विकास करण्यात यावा याबाबतचे पत्र आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना शुक्रवारी दिले.

गरिबांना घरे मिळवून देण्याचे स्वप्न

सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यात सत्ता आहे. शहर मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्यांचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. तसेच बी टू नियमाच्या अडथळ्यामुळे शहरातील अनेक कामगार चाळी आणि सोसायटीचा विकास थांबला आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे आणि बी टू (सत्ता प्रकार – २ ब) नियम माफ करून घेऊन सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे प्रयत्न करू.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त.. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आली शोभायात्रा…

Next Post

भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे सोलापूर आणि मडगाव येथून अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे सोलापूर आणि मडगाव येथून अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा…

भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे सोलापूर आणि मडगाव येथून अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा…

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026