• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २८ ते ३१ जानेवारी पर्यंत होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2021
in मुख्य बातमी
0
पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २८ ते ३१ जानेवारी पर्यंत होणार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार आहे. या संमेलनासाठी नऊ अध्यक्षांचे मंडळ असून ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर या संमेलनाचे महासंमेलनाध्यक्ष आहेत. या संमेलनामध्ये एक दिवस स्वतंत्रपणे विश्व मराठी युवा संमेलनही आयोजित करण्यात आले आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा करण्यात आली.

या माध्यमातून १२ कोटी मराठी भाषकांना जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच संमेलन असेल.अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.क्षितिज पाटूकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी दिली.

या संमेलनामध्ये जगभरातील ३२ देशांतून, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि १५० हून अधिक संस्था, पाचशेहून अधिक वाचनालये आणि हजारहून अधिक महविद्यालयांचा सहभाग यामध्ये असेल. तसेच साहित्य, संस्कृती यासोबतच उद्योजकता, लोककला याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून उत्तर अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्ष विद्या जोशी संमेलनाच्या महासंरक्षक आहेत.नऊ जणांच्या अध्यक्ष मंडळामध्ये साहित्य विभागाचे अध्यक्ष भारत सासणे, डॉ. विनता कुलकर्णी आहेत. संस्कृती विभागाचे अध्यक्ष सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, उद्योजक विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल कुलकर्णी, युवा विभागाचे अध्यक्ष उमेश झिरपे आणि अजित रानडे आहेत. संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि शहरांमधून २०१ प्रतिनिधी या संमेलनाशी जोडले गेले आहेत. संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कविकट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा – कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा- सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी उपक्रम सादर होतील.

संस्कृती उलगडणार
संस्कृतीची खेडोपाड्यांमध्ये वसलेली पाळेमुळे ही जागतिक स्तरावर पोहोचवण्यास मदत होईल. वैश्विक प्रतिभा संगम यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, पोवाडा, लावणी, वासुदेव, कडकलक्ष्मी, मर्दानी खेळ, एकपात्री कलाकार, सूत्रसंचालक, निवेदक, पोतराज,एकांकिका सादर करणारे, चित्रकार, भटजी (पौरोहित्य करणारे), दशावतार, खेळाडू, गोंधळी, मंगळागौर, नृत्यांगना, धनगरी नृत्य, दंडार, खाडी गम्मत, तुंबडी वादक, पालखी, जाखडी, नकटा, लेझिम पथक, ढोल पथक, संबळ पथक याविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे.

सोलापूरच्या तिघांचा सहभाग
विश्व साहित्य संमेलनासाठी सोलापुरातून तिघांचा सहभाग यात सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांनी अरण्यऋषी आणि जेष्ठ साहित्यीक मारुती चितमपल्ली यांची घेतलेली मुलाखत रविवार दि ३१ जानेवारी रोजी दुपारी १२-४५ वाजता होणार आहे. मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि पंढरपूरचे कल्याण शिंदे यांचा “साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव” या परिसंवादात सहभाग आहे.हा परिसंवाद गुरुवार दि .२८ जानेवारी रोजी सायंकाळी ७-३० वाजता होणार आहे.

Previous Post

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित “अर्थाच्या अवती-भवती” या ई-पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

Related Posts

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
Next Post
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : बापू बांगर साताऱ्याला, दिपाली घाटे ठाण्याला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026