कोरोनानंतर पहिल्यांदा टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली पंढरी
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निर्जला एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सोमवारी निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपूर नगरी टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात दुमदुमली आहे. कोरोनानंतर जवळपास दीड वर्षाने पंढरी नगरी दुमदमली आहे.
गेल्या वर्षभरापासून पंढरपुरात टाळकरी, फडकरी यांची नगरप्रदक्षिणा झाली नव्हती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पंढरपुरात फडकरी, टाळकरी यांनी प्रदक्षिणा मार्गावर १५ जणांच्या सोबत टाळ मृदुंगाच्या गजरात आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. वारकऱ्यांची ही शिस्त पाहून शासनाने पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी राजाभाऊ चोपदार यानी केली आहे . कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर बंद आहे. त्यामुळे अनेक भाविक हे नामदेव पायरी आणि मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतले