सोलापूर : कोरोना नियमांचे पालन न केल्याने जी दुकाने सील करण्यात आली आहेत. त्या दुकान मालकांना सात दिवस झाल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता दुकाने उघडता येतील, असा आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढला आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास वार्षिक दंड करून दुकाने सील करण्यात येतील असेही आयुक्तांनी म्हटले आहे.