सोलापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला शहर विकास आराखडा अर्थात डीपी प्लॅन शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणे गरजेचे असताना महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी हा प्लॅन अडवून ठेवला आहे. सोलापूर शहराचे पुढील वीस वर्षाचे नियोजन या डीपी प्लॅनमध्ये असते. विविध प्रकारची आरक्षणे, रस्ते विकास, बगीचा, यासह संपूर्ण शहराचा विकास करण्याबाबत हा सर्वसमावेशक असलेला डेव्हलपमेंट प्लॅन अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र शहरातील नाले या प्लॅनमध्ये घेण्याच्या नावाखाली गेल्या तीन चार महिन्यापासून हा प्लॅन महापालिकेचे अडकून पडला आहे. यामुळे कोट्यावधी रुपये घेऊन काही अधिकारी ज्यांच्या मिळकतीवर रिझर्वेशन पडले ते सोयीस्कर पद्धतीने काढू लागले आहेत. डीपी प्लॅन नियोजित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे मात्र काही मंत्री, आमदार, बिल्डर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर वारे माप पैसे देऊन या डीपी प्लॅनमध्ये मनमानी पद्धतीने बदल करू लागले आहेत. यामुळे आयुक्तांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

