सोलापूर शहरातील जीएम चौकात सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार संजय शिंदे डॉक्टर डॉक्टर सचिन पांढरे डॉक्टर मेहबूब मुलानी, यांच्यासह राजा सरवदे ,बाळासाहेब वाघमारे ,आनंद चंदनशिवे अमोल शिंदे गणेश पुजारी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच धन्वंतरीचे पूजन करून या हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले. डॉक्टर अभय लुनावत यांनी प्रास्तावित केले. या हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर श्रीकांत माकम यांनी हॉस्पिटल उभा करण्यामागचा उद्देश सांगितला.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोलापुरातील अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन हे हॉस्पिटल उभा करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केले तसेच कोविड नंतर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. आमदार संजय मामा शिंदे यांनी सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर मंडळींनी या हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे योगदान दिले असल्याचे मत व्यक्त केले.











