शिवाजी चौकातच मोर्चा संपला मात्र कार्यकर्ते पार्क चौकापर्यंत गेले…. नरेंद्र पाटील यांच्या ५ जण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना
सोलापूर : सोलापुरात आज रविवारी दुपारी एक वाजता घोषणाबाजी करत मराठा आरक्षणासाठी मराठा आक्रोश मोर्चा निघाला. भाजपच्या आमदारांना ग्रामीण भागातून येण्यासाठी मज्जाव केल्यामुळे दोन तास मोर्चा लेट झाला त्यांना सोडल्यानंतर दुपारी एक वाजता हा मोर्चा काढण्यात आला सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी प्रचंड मोठा असा पोलिस बंदोबस्त लावल्यामुळे अनेकांना सोलापूर शहरात येता आले नाही मोर्चाचं पहिला टोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर शेवटचे टोक छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत होते
मोर्चात केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत जाणारा रस्ता आणि या रस्त्याला मिळणारे इतर सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकॅटीग टाकून बंद केले आहेत. शहरात येणाऱ्या सातही नाक्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त असून मोर्चासाठी येणारी वाहने तिथेच अडविली. माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे, आमदार राजा राऊत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,आमदार सचिन कल्याण शेट्टी खासदार ,जय सिद्धेश्वर शिवाचार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह विविध संघटना तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समाधान आवताडे रणजितसिंह मोहिते पाटील राजा राऊत सचिन कल्याण शेट्टी यांना बराच वेळ पोलिसांनी अडविल्या मुळे मोर्चा दोन तास उशीरा निघाला. मोर्चा कडे येणाऱ्या अनेक गाड्या रोखल्या असल्या तरी अनेक जण मोर्चात सहभागी झाले आहेत.