मंगळवेढा : सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चासाठी मंगळवेढ्यातुन सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
शांततामय मार्गाने 58 मोर्चे काढून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर येथे संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार आहे. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवेढा व सांगोल्यातून सोलापूर येथे जाणाऱ्या आंदोलकांना मंगळवेढा येथील सांगोला नाका, खोमनाळ नाका, बोराळे नाका, माचणूर, बेगमपूर, वाघोली, कामती, तिर्हे, बी.एम.आय.टी काॅलेज, देगाव गावाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामध्ये आंदोलकांच्या गाड्यांची तपासणी करून 4 आंदोलकांना सोडण्यात येत आहे. अशा आंदोलकांच्या गाड्यांना सोडावे, या मागणीसाठी आ. समाधान आवताडे हे आक्रमक झाले.