सोलापूर सह राज्यभरातील अनेक शहरात तापमानाचा पारा दररोज नवे नवे रेकॉर्ड करीत आहे. अजून किमान दीड महिना उन्हाळा बाकी असताना सूर्य आग ओकू लागला आहे. घामाच्या धारांनी भिजणाऱ्या सोलापूरकरांनी काल 42.5 अंश तापमानाचा अनुभव घेतला. उजनी धरणातील पाणी पातळी देखील झपाट्याने कमी होऊ लागल्यामुळे 121 टीएमसी एवढी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाण्याचे टेन्शन देखील वाढू लागली आहे. आज च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात 80 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.यातील जिवंत पाणीसाठा हा 17 टीएमसी म्हणजेच 32% आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी उजनी धरणात एकूण 67 टीएमसी एवढा पाणीसाठा यातील चार टीएमसी म्हणजे अवघा सात टक्के एवढाच पाणीसाठा जिवंत पाणीसाठा होता. गेल्या वर्षी धो -धो पाऊस झाला आणि किमान दोन उजनी धरण क्षमते एवढे म्हणजेच सुमारे अडीचशे टीएमसी पाणी भीमा नदीतून वाहून कर्नाटकात गेले. हे पाणी अडवण्यासंदर्भात वर्षभरात काहीच उपाययोजना झाल्या नाही. कारण यंदाच्या वर्षी अल निनो मुळे मान्सून वर विपरीत परिणाम होणार अशा बातम्या झळकू लागल्या आहेत. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने आपल्या अंदाजात वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्याचे वाढते तापमान.. पुणे,सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील घटनारा पाणीसाठा आणि यंदा कमी मान्सून याचे सर्वांना टेन्शन आहे.

