• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2026
in इतर घडामोडी
0
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर- कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृषी तज्ज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखन साहेब, कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर श्री रामचंद्र माळी व त्यांचे अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी प्रास्ताविक करत कृषी दिनाचे महत्त्व, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि शेतकरी कल्याणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्ष रोप,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याचबरोबर कृषी विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी हितासाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी मार्गदर्शन करताना प्रगतशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये योगदान देणे बाबत आवाहन केले.

कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी ” एल निनो काळात आपत्कालीन पीक व्यवस्थापन व सोयाबीन व तूर लागवडीची पंचसूत्री तसेच खरीप हंगामाचे नियोजन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत, कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड.अमृता वाघे यांनी मार्गदर्शन करताना अमृता वाघे म्हणाल्या, “एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो.” शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचते. त्यामुळे शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा भक्कम आधार आहे.

समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी, “मी स्वतः एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची, वेदनेची आणि तळमळीची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील,” असे सांगत शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले, तर कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आत्मा सोलापूरचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026