तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव १ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर; वाटेगाव मध्ये करणार अण्णाभाऊंना अभिवादन

0
49

सांगली ( सुधीर गोखले ) – सांगली जिल्हा हि क्रांतिकारकांची, क्रांतिवीरांची भूमी हि माजी मुख्यमंत्री कै डॉ वसंतदादा पाटील यांची क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी आणि देशासाठी हुतात्म्य पत्करलेल्या कित्तेक ज्ञात अज्ञात वीरांची भूमी तशीच हि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊंचा जन्मदिवस त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे उपस्थित राहणार असल्याची माहिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू आणि मानव जनहित पक्षाचे नेते सचिन साठे यांनी दिली. आतापर्यंत महाराष्ट्राचे एकही मुख्यमंत्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी वाटेगाव येथे आलेले नाहीत पण परराज्यातील कोसो दूर असलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री याठिकाणी येणार असल्याने तशी तयारीही जोरात सुरु आहे अण्णाभाऊंनी विचारांची पताका जगभर पसरवली परदेशात त्यांचे पुतळे उभे केले जातात मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे एखादे स्मारकही नसावे हि अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.सांगली येथील नव्याने बांधलेल्या हरिपूर कोथळी या पुलास लोकशाहिरांचे नाव देण्याच्या मागणीचा विचारही लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाहीत यांची खंत वाटते.  एक ऑगस्ट रोजी जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंच्या सून सावित्रीमाई साठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लोकशाहिरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित केली आहे. भारत राष्ट्र समितीचे राज्य प्रमुख शंकर धोंगडे भगीरथ भालके हेही उपस्थिती राहणार आहेत या सभेमध्ये प्रा शरद गायकवाड यांचा सत्कार होणार आहे.