• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2026
in इतर घडामोडी
0
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
0
SHARES
3
VIEWS

पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची वारीपूर्वी अंमलबजावणी करण्यात येणार.

पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वाहनांना मार्गावर डिझेल/पेट्रोलची कमतरता भासणार नाही.

पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेली 80 टक्के कामे पूर्णत्वाकडे.

पंढरपूर-आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून, आषाढी यात्रेसाठी पूर्वीच पालखी मार्ग, तळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्तांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून 80 टक्के कामे पूर्णत्वाकडे येत आहेत. आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यांसोबत येणाऱ्या दिंड्या व भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी तसेच पंढरपूरमध्ये गतवर्षीपेक्षा दीडपट अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुख यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे करण्यात येतात. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने काही कामांच्या निविदाबाबत निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहे. त्यामुळे आवश्यक सर्व कामे पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार आहेत.

पालखी तळाच्या ठिकाणी मुरमीकरण करण्यात येणार आहे. वाढीव पालखी तळाबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. पालखी मार्गावर व तळांवर सुलभ शौचालय, स्नानगृह, वॉटरप्रूफ मंडप, रुग्णवाहिका आदींची संख्या वाढविण्यात येणार आहे.

पालखी मार्गावरील पेट्रोल पंपांवर सोहळ्यासोबत येणाऱ्या वाहनांना पेट्रोल/डिझेल उपलब्ध होण्यासाठी संबंधितांना तात्काळ सूचना देण्यात येणार असून गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात येईल.

भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. आषाढी यात्रा सोहळा कालावधीत पालखी सोहळ्यासह वारकरी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी जर्मन हँगरच्या सुविधेत वाढ करण्यात येणार असून, पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोडी तसेच घोडे यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल. पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी सोहळे संबंधित मुक्कामाच्या ठिकाणावरून पुढे गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या पूर्णिमेला श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात दाखल होतात आणि सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात येतात. यावेळी संत देव भेट सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रथा-परंपरेनुसार योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुख यांनी पुढील सूचना केल्या: पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने काही ठिकाणी पालकी तळ कमी पडत आहेत; त्यामुळे ते तळ वाढवून देण्यात यावेत. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळे पालखी मार्गावरून जात असताना वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे. तसेच पालखी तळांवर मुरमीकरण करावे.

गतवर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर, तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी-सुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

Next Post

जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026