• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2022
in मुख्य बातमी
0
खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार किंवा वितरकांनी शेतकऱ्यांना नियमित खते उपलब्ध करून द्यावीत. डीएपी आणि युरिया खताचा साठा केल्याचे आढळल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह विविध खत कंपनी, बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढत आहे. यामुळे बी-बियाणे आणि खतांची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे खते आणि बियाणे उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. शासनाच्या दराप्रमाणे इ-पॉश मशिनवर खताची विक्री करावी. कंपन्यांनी खताचा साठा किती, कधी येणार, याची आगावू माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक आहे. खते-बियाणे कंपन्यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून आपला खतांचा साठा इतर राज्यात, जिल्ह्यात जाणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

येणाऱ्या खरीप हंगामासाठी युरिया कमी पडणार नाही, याची दक्षता आतापासूनच घ्या. पावसाळ्यापूर्वी आगावू मागणी नोंदवून खते कमी पडणार नाहीत, याचे नियोजन करा. वितरण व्यवस्था सुधारा, खतांच्या पुरवठा, दर्जा आणि किंमतीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोयाबीन, सूर्यफूल बियाणांची मागणी वाढणार असल्याने याचेही नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांनी सांगितले की, रब्बीबरोबर खरिपाचे क्षेत्रही वाढले असल्याने खते आणि बियाणे मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. शेतकऱ्यांना बायो फर्टिलायझर, नॅनो युरिया याबाबत माहिती द्यायला हवी. कोणत्यावेळी कसे खत द्यावे, जमिनीतून द्यावे की स्प्रेद्वारे द्यावे, याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत.

यंदा 21 एप्रिल 2022 अखेर खरीप हंगामासाठी 2 लाख 91 हजार 900 मेट्रीक टन खतांची मागणी केली होती. 2 लाख 33 हजार 270 मेट्रीक टन मंजूर झाले होते. 61 हजार 823 मेट्रीक टन साठा शिल्लक असल्याची माहिती श्री. कुंभार यांनी दिली. शिवाय खते-बियाणांची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर

Next Post

आपत्तीबाबत यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी

Related Posts

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Next Post
आपत्तीबाबत यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी

आपत्तीबाबत यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026