• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंद्रूपला वीज कंपनीचे उपविभागीय कार्यालय मंजूर..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 26, 2025
in इतर घडामोडी
0
मंद्रूपला वीज कंपनीचे उपविभागीय कार्यालय मंजूर..
0
SHARES
0
VIEWS

आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश..

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या गावासाठी अखेर वीज वितरण कंपनीने स्वतंत्र उपविभागीय कार्यालयास मंजुरी दिली आहे. या कार्यालयासाठी बारा पदांची निर्मिती होणार असून पुढील महिन्यात या कार्यालयाच्या निर्मितीस सुरुवात होणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या मंद्रूप हे बारामती परिमंडळातील सोलापूर मंडळ अंतर्गत सोलापूर ग्रामीण उपविभागीय क्रमांक दोनशी जोडलेले आहे. या विद्यमान कार्यालयाचे विभाजन करून मंद्रूप येथे नवीन उपविभागीय कार्यालयाची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.

या नव्या कार्यालयाखाली मंद्रूप, भंडारकवठे, अंत्रोळी आणि वडकबाळ या गावांतील शाखांचा समावेश करण्यात येणार आहे. कार्यालयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकूण बारा पदांची निर्मिती करण्यात आली असून, यामुळे मनुष्यबळाची समस्या सुटणार आहे.

नव्या कार्यालयासाठी १ कोटी २६ लाख ७३ हजार ९२ रुपये एवढ्या खर्चास मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर कार्यालयीन इमारतीच्या निर्मितीसाठी ७ लाख रुपये खर्चाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत.

नवीन उपविभागीय कार्यालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना वीज बिल, नवीन जोडणी, तांत्रिक बिघाड, ट्रान्सफॉर्मर समस्या यांसारखी सर्व कामे मंद्रूपमध्येच सहजरीत्या करता येणार आहेत. आतापर्यंत ही सर्व कामे सोलापूर ग्रामीण-०२ उपविभागीय कार्यालयात करावी लागत होती. त्यामुळे वेळ, खर्च आणि त्रास सहन करावा लागत होता.

स्थानिक ग्रामस्थ आणि वीज ग्राहकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा मोठा प्रशासकीय दिलासा मिळाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

नवीन उपविभागीय कार्यालयामुळे मंद्रूप व परिसरातील वीजसेवा अधिक परिणामकारक होऊन जनतेला तात्काळ सेवा मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली आहे.

आमदार सुभाष देशमुख –
“मंद्रूप व दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी होती. तिची पूर्तता करून आम्ही नागरिकांना सोयीस्कर सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या कार्यालयामुळे सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक होईल.”

Previous Post

माथाडी कायदा सरकारने मजबुत केला पाहिजे – शिवाजी शिंदे..

Next Post

निमा वुमन्स फोरम सोलापूर शाखेतर्फे ललिता पंचमी निमित्त कुमकुमार्चन व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
निमा वुमन्स फोरम सोलापूर शाखेतर्फे ललिता पंचमी निमित्त कुमकुमार्चन व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन

निमा वुमन्स फोरम सोलापूर शाखेतर्फे ललिता पंचमी निमित्त कुमकुमार्चन व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026