सोलापूर : महाराष्ट्र शासन मान्यता स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता, आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षिका, आदर्श कर्मचारी अशा फक्त महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता हरिभाई देवकरण प्रशाला मुळे हॉल सोलापूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमास मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री कार्यालय वैद्यकीय कक्ष राज्य प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी,यांच्या शुभहस्ते व मनीष काळजे जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक,कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक, मनीषा कुंभार निवासी जिल्हाधिकारी सोलापूर, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.
सदर पुरस्कार वितरण संदर्भामध्ये कार्यक्रमाचे संयोजक प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सदस्य पुणे बोर्ड प्रा डॉ.बापूसाहेब आडसूळ यांनी परिषद घेऊन जाहीर केले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आदर्श माता,आदर्श मुख्याध्यापिका,आदर्श शिक्षिका असे ५० महिलांना पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले आहे.
सदर परिषदेमध्ये प्रदेश सचिव प्रा. गंगाधर पडणुरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.मारुती खरात, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.देविदास जगताप, प्रदेश प्रवक्ते संजयकुमार घोडके, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ.शिवाजी व्हनकडे,सचिव मीनाक्षी जाधव, जिल्हाध्यक्ष प्रा डॉ.भाग्यश्री राठोड सोलापूर शहराध्यक्ष स्वाती खरवले, इत्यादी कोअर कमिटीतील पदाधिकारी उपस्थित होते.










