• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in इतर घडामोडी
0
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
0
SHARES
2
VIEWS

१७ सप्टेंबर रोजी वितरण: शिक्षणातज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान

सोलापूर : शिक्षण हाच धर्म मानून अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे कार्य करणारे लिंगैक्य शंकरराव नागप्पा सोनकवडे ऊर्फ सोनकवडे गुरुजी यांच्या २९व्या स्मृतिदिनानिमित्त सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता किल्लेस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय, किल्ला बागेसमोर, सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जेष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोनकवडे गुरुजी यांनी सोलापूर महानगरपालिकेतील शिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावताना शिक्षणाला केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकीचे माध्यम मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.यंदाचा ‘सावित्री-ज्योती गुरु गौरव पुरस्कार २०२६’ सेवानिवृत्त शिक्षक श्रीमंत कांबळे ह. दे. प्रशाला, सोलापूर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ अंतर्गत विविध शाळा व अंगणवाड्यांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी संगीता जाधव मनपा शाळा नं. २, सोलापूर, गौरीशंकर नारायणे मनपा शाळा नं. २८, सोलापूर, किरण बाबर जि. प. प्राथमिक शाळा, अर्जुनसोंड, ता. मोहोळ, प्रीती साबणे जि. प. शाळा, तीर्थ, ता. दक्षिण सोलापूर, शकीला शेख अंगणवाडी, होटगी, ता. दक्षिण सोलापूर, सरिता माळवदकर अंगणवाडी, दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर आणि शिला हावळे सौ. गोपाबाई रामकिसन बलवदा हायस्कूल, देगाव यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके अध्यक्षस्थानी राहणार आहेत. खासदार प्रणितीताई शिंदे, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड आणि ज्येष्ठ उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोनकवडे गुरुजींच्या शिक्षणविषयक कार्याची आठवण जागविण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा हा सोहळा असल्याने शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे, उपाध्यक्ष गीता अमोल शिंदे आणि सचिव राजश्री सोनकवडे यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस दत्ता गायकवाड, नागनाथ सोनकवडे, बीटी म्हेत्रे आणि दत्ता थोरे उपस्थित होते.

Previous Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

Next Post

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
Next Post
विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026