सोलापूर :अधिक मासानिमित्त दमाणी नगर येथील गडदर्शन हॉलमध्ये ह.भ.प. माऊली महाराज बचुटे-सवाळकर मित्र परिवाराच्या वतीने पंचदिनी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १० जून ते रविवार, १४ जून या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
या महोत्सवात संत परंपरेतील व फड परंपरेचे वंशज कीर्तनसेवेसाठी उपस्थित राहणार आहेत. रोज सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी अध्याय ९, १२ व १८ चे पारायण, सायंकाळी ५:३० ते ६:३० हरिपाठ व रात्री ८ ते १० कीर्तन होईल. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवासाठी समस्त फडांवरील वारकरी समाज व सोलापूरातील नामवंत गायक-वादक मंडळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी आमचे दैवत ग्रुप मित्र परिवार, गड दर्शन सोसायटी परिवार, गवळी वस्ती विठ्ठल मंदिर समस्त सेवेकरी व लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळ संचलित राजमुद्रा युवक प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कीर्तन कार्यक्रम असा :
१० जून, बुधवार : रात्री ८ वा. – ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर
११ जून, गुरुवार : सकाळी १० वा. – ह.भ.प. माधव महाराज नामदास, रात्री ८ वा. – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर
१२ जून, शुक्रवार : सकाळी १० वा. – ह.भ.प. हरी महाराज राशिनकर, रात्री ८ वा. – ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी
१३ जून, शनिवार : रात्री ८ वा. – ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले
१४ जून, रविवार : सकाळी १० वा. – ह.भ.प. कान्होबा महाराज देहुकर यांचे काल्याचे कीर्तन
भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. माऊली महाराज बचुटे-सवाळकर यांनी केले आहे.











