• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

by Yes News Marathi
January 14, 2026
in मुख्य बातमी
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदानपूर्व तयारीची मुख्य निवडणूक निरीक्षक व आयुक्तांकडून पाहणी…

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्य निवडणूक निरीक्षक मा. श्रीमती नयना गुंडे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मतदानपूर्व तयारीची पाहणी केली.यावेळी एस. आर. फी कॅम्प, मेहता प्रशाला तसेच शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी भेट देण्यात आली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र वितरण केंद्रांची, स्ट्राँगरूमची तसेच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेची सविस्तर पाहणी करण्यात आली. मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज शहरातील सर्व सात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील ठिकाणी मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच मूलभूत सुविधांची योग्य ती आखणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, तसेच मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना मा. निरीक्षक व आयुक्त यांनी दिल्या.सोलापूर शहरातील मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी व सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन….

Next Post

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाई

Next Post
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाई

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाई

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In