भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्याच्या विरोधात सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन

0
32

दिनांक 18 जुलै 2023 – बेछूट खोटे – नाटे आरोप करून अनेकांची सार्वजनिक प्रतिमा मलीन करणाऱ्या, सर्वांवर शिंतोडे उडवणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ किळसवाणा प्रकार आहे. दुसऱ्यांचे चारित्र्य हनन करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या किरीट सोमय्या याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी, त्याचा निषेध करण्यासाठी, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन जवळ येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले.

यावेळी किरीट सोमय्या आणि भाजपच्या विरोधात निम का पत्त्ता कड़वा है किरीट सोमय्या भडवा है, अत्याचारी भाजपा नेत्यांचा धिक्कार असो, अश्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजपर्यंत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून बदनाम केले. अनेकांना जाणीवपूर्वक त्रास दिला गेला. भाजप सरकारने त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांना जेल मध्ये घातले. अनेकांनावर चिखलफेक करणाऱ्या किरीट सोमय्या याचा चिखलात लोळनारा महिलासोबत अश्लील हरकत करतानाचा वीडियो समोर आला आहे. यापूर्वी ही अनेक भाजप नेत्यांनी महिलांवर अत्याचार केलेले प्रकरणे पुढे येऊन सुद्धा भाजप त्यांच्यावर कारवाई करत नाही. दिल्लीत महिला खेळाडूवर अत्याचार करणारा ब्रिजभूषण आजही मोकळा फिरत आहे. यावरून भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत यावरून दिसून येत आहे. महिलांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने आंदोलन करून मागणी करत आहोत की, या भाजपच्या पोपट किरीट सोमय्या यांच्या VDO ची आणि त्याची चौकशी करून कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहोत.

या निदर्शने आंदोलनात चेतन नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, मा. नगरसेवक विनोद भोसले, दत्तूअण्णा बंदपट्टे, रियाज हुंडेक़री, मा. नगरसेविका फिरदौस पटेल, हेमाताई चिंचोळकर, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, देवाभाऊ गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, सुमन जाधव, अँड करीमनिस्सा बागवान, शोभा बोबे, महेश लोंढे, अंजली मंगोडेकर, लता गुंडला, मीरा घटकांबळे, अरुणा बेंजरपे, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, प्रवीण वाले, विवेक कन्ना, हारून शेख, अनिल मस्के, संजय गायकवाड़, सुभाष वाघमारे, दिनानाथ शेळके, नागनाथ शावने, श्रीशैल रणधिरे, अफरोज तांबोळी, वसिष्ठ सोनकांबळे, समीर काझी, व्यंकटेश बोम्मन, रविकांत कल्याणकर, शरीफा कोथिनबीरे, मुन्नीबाई शेख, व्यंकटेश गोन्याल यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.