सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘ प्लेसमेंट ‘ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी

0
38

सोलापूर: केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणीक २०२२-२३ मध्ये २३० विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे निवड झाली आहे. यामध्ये कॉग्निझंट,असेंचर, इन्फोसिस,पीटीसी, टीसीएस, विप्रो, जियो स्पटील, अटॉस, बिर्लासॉफ्ट, परसिसस्टंट, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, हिताची, जय इंजिनीअर्स, लक्ष्मी हायड्रॉलीक्स, जाबील, विश्वजित कॅपॅसिटर्स, जियो, रिलायन्स, आयटीसी इन्फोटेक, वोडाफोन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, क्रेडिट सुईस, बायजूस, मोडक अनालिटिक्स, ब्ल्यू फ्लेम, कॅपजेमिनी, नेईलसोफ्ट इंटास, अमडॉक्स अशा अनेक नामांकित राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.आयटी क्षेत्राबरोबरच मेकॅनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रिकल पार्श्वभूमी असलेल्या आघाडीच्या व अग्रगण्य कंपन्या सिंहगड च्या केंद्रीभूत प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून या प्लेसमेंट केल्या जातात. या कंपन्यात निवड होण्यासाठी खडतर असे राऊंड असतात. हे राऊंड यशस्वी रित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच नोकरीची संधी मिळाली आहे. या पूर्ण प्रक्रियेबद्दल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे यांनी सांगीतले की, सिंहगड महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिकत असतानाच विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स व ॲप्टिट्यूड टेस्टची जोरदार तयारी करून घेतली जाते. तिसऱ्या वर्षात असताना मुलांचे मूल्यांकन केले जाते व जिथे कमतरता आहे त्यावर अधिक काम करून ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ची प्रक्रिया माहित व्हावी यासाठी नामवंत कंपन्यांचे मनुष्यबळ अधिकारी यांच्या वेबिनारचे आयोजन केले जाते, एखाद्या विशिष्ट निवड व्हायची असेल तर त्याची तयारी कशी करायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे ॲमकॅट व कोक्यूब या नामवंत कंपन्यांद्वारे मूल्यांकन केले जाते, त्याद्वारे विद्यार्थ्यांना कोणत्या बाबींवर भर द्यावा लागेल हे समजते. सर्व सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूरचे विद्यार्थी या प्रक्रियेतून जात असतात, त्यामुळे पदवी अंतिम वर्षात असतानाच या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे नोकरीची संधी मिळते असे सांगितले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये सिंहगड सोलापूरच्या बाबतींत एक समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.

 • ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ६ लाखांचे पॅकेज मिळाले.
 • ५७ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ४.५ लाखांचे पॅकेज मिळाले.
 • ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ४ लाखांचे पॅकेज मिळाले.
 • ७० विद्यार्थ्यांची कॉग्नीझंट या नामांकित कंपनीत निवड.
  -५८ विद्यार्थ्यांची असेंचर या नामांकित कंपनीत निवड.
  -४० विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित कंपनीत निवड.
  -३२ विद्यार्थ्यांची विप्रो या नामांकित कंपनीत निवड.
 • सरासरी ४.८ लाखांचे पॅकेज.