• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर फाऊंडेशन महाराष्ट्रचे ‘सर सन्मान’ पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2023
in इतर घडामोडी
0
सर फाऊंडेशन महाराष्ट्रचे ‘सर सन्मान’ पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS
सोलापूर  : स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन, महाराष्ट्र दरवर्षी राज्य व राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्राबरोबरच, ग्राम विकास, साहित्य लेखन, सामाजिक, संशोधन व ग्रासरूट इनोव्हेशन क्षेत्रातही विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्च पदावर कार्यरत व्यक्तींना, त्यांच्या कार्याला सलाम म्हणून प्रतिष्ठेचा सर सन्मान हा राष्ट्रीयस्तर पुरस्कार देऊन सात व्यक्तींना सन्मानित करत असते. यावर्षी पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. 

  या वर्षीचे 'सर सन्मान' पुरस्कार घोषित करण्यात आल्याची माहिती सर फाऊंडेशन राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे-वाघ यांनी दिली.

 सर सन्मानाने यांना केले जाणार सन्मानित -

1) श्री. डी. राम रेड्डी (व्यवस्थापकीय संचालक बालाजी अमाईन्स लिमिटेड)
2) श्री. शेखर गायकवाड (IAS) (साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे)
3) डॉ. श्री. कलीमोद्दीन शेख (संचालक, महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा संस्था, औरंगाबाद)
4) डॉ. श्री. दीपक माळी (प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे)
5) डॉ. सौ. किरण धांडे (प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा, पुणे)
6) श्री. प्रदीप मोरे (माजी शिक्षण उपसंचालक पुणे)
7) सर सन्मान गुरू वंदना श्री. दत्तात्रय वारे (ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक, वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेचे शिल्पकार पुणे)

     पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह व महावस्त्र असे आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कोणतेही अर्ज अथवा फाइल मागविली जात नाही. सर फौंडेशन च्या तज्ञ निवड समिती द्वारा या विजेत्यांची निवड करण्यात येते. 

पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 10 वा. सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूर येथे राष्ट्रीयस्तर कॉन्फरन्समध्ये होणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते, कोलकत्ता येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, मुंबई म्हाडा पुनर्विकासचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. अरुण डोंगरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, आयकर उपायुक्त श्री. स्वप्निल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. देशभरातील प्रयोगशील शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

यावेळी सर फाऊंडेशन आयटी विभागप्रमुख राजकिरण चव्हाण, जिल्हा समन्वयक अनघा जहागीरदार, नवनाथ शिंदे, गुणवंत चव्हाण, विजयकुमार वसंतपुरे, मोतीलाल जाधव, मारुती जावीर, डॉ. सतीश सातपुते, शोभा माने, राजन गरुड, आनंद आनेमवाड, शिल्पा वनमाळी आदी उपस्थित होते.

Previous Post

डस्टर गाडीतून दीड लाखाची गोवा दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next Post

दमाणी परिवाराकडून दहावीच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना निरोप

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
दमाणी परिवाराकडून दहावीच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना निरोप

दमाणी परिवाराकडून दहावीच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना निरोप

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026