• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2026
in मुख्य बातमी
0
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
0
VIEWS

महापालिका व नगरपालिकांनी १० टक्के पाणी बचत करावी; पाणी आवर्तनाचे काटेकोर नियोजन करावे

नदीकाठच्या गावांना एक दिवस आड सलग सहा तास वीज पुरवठा होणार

सोलापूर : जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व पाणीपुरवठा योजनांना नियमानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. उजनी धरणासह मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा मर्यादित असल्याने नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. महापालिका व नगरपालिकांनी शासन निर्णयानुसार १० टक्के पाणी बचतीचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, धीरज साळी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, श्री. कंदले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पुणे जिल्हाधिकारी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी तसेच जलसंपदाचे पुणे येथील वरिष्ठ अधिकारी हे दूरदृष्श्य प्रणाली द्वारे सहभागी होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, सद्यस्थितीत उजनी धरणात ६५ टक्के पाणीसाठा असून मध्यम व लघु प्रकल्पांमध्येही अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनांना नियमानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. पाण्याचा अनावश्यक वापर आणि होणारी नासाडी रोखण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनीही प्रयत्न करावेत. धरणातील पाण्याची सद्यस्थिती शेतकरी व नागरिकांना समजावून सांगण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनीही घ्यावी. पाण्याची नासाडी टाळल्यास किमान १० ते १५ टक्के पाणी बचत करणे शक्य असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

नदी व कालव्यालगतच्या गावांना एक दिवसाआड सलग सहा तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधीच्या मागणीप्रमाणे नियोजन करावे. यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पुणे व अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकाच वेळी आणि समप्रमाणात वीजपुरवठा उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे आणि पिके उभी आहेत, त्यांना आवश्यक पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या पिकांचा विचार करून योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

पाणी प्रकल्पातून आवर्तन सुरू करण्यापूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. आवर्तन सुरू करण्यापूर्वी संबंधित भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील लागू तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याबाबत कार्यवाही करावी. पाणी सोडल्यानंतर कालवा फोडणे किंवा पाण्याचा अनधिकृत उपसा करणे असे प्रकार आढळल्यास जलसंपदा विभागाने संबंधितांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करावेत. पोलीस विभागानेही अशा प्रकारांची गंभीर दखल घेऊन कठोर कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.

पुढील पाणी आवर्तनाचे नियोजन डिसेंबर २०२६ अखेर, जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यात तसेच फेब्रुवारी २०२७ मध्ये उपलब्ध पाणीसाठा व गरज लक्षात घेऊन करावे. जलसंपदा विभागाच्या नादुरुस्त यंत्रणा तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात. तसेच अतिरिक्त पंप उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित उपाययोजनेंतर्गत आवश्यक निधीची मागणी करावी, असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत यांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. पाणीपुरवठा करताना शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्हाधिकारी म्हणाले की, पालकमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर व जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी समन्वय ठेवून नदीकाठच्या गावांना वीज पुरवठा बाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

प्रारंभी अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी उजनी धरण व जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प व लघु प्रकल्पातील पाण्याची सद्यस्थिती सांगितली. आज रोजी उजनी धरणात ६५ टक्के पाणी उपलब्ध आहे तर मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्याच्या दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या सद्यस्थितीनुसार, एकरुख प्रकल्पातील ०.५५ टीएमसी पाणीसाठ्यावर सोलापूर, गोदुताई परुळेकर सहकारी संस्था व १४ ग्रामपंचायती अवलंबून असून ते पाणी दि. ३० जून २०२७ पर्यंत पुरणार आहे. हिंगणी (पा) प्रकल्पातील ०.४४ टीएमसी पाण्यावर वैराग व ९ ग्रामपंचायती अवलंबून असून ते दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत, तर जवळगाव प्रकल्पातील ०.३६ टीएमसी पाण्यावर ९ ग्रामपंचायती अवलंबून असून तेही दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरणार आहे. मांगी प्रकल्पातील ०.०९ टीएमसी पाण्यावर १३ ग्रामपंचायती अवलंबून असून ते फक्त दि. ३१ जानेवारी २०२७ पर्यंत, आष्टी प्रकल्पातील ०.४८ टीएमसी पाण्यावर माढा व ६ ग्रामपंचायती अवलंबून असून या योजनेसाठी उजनी डाव्या कालव्यावाटे पाणी सोडण्यात येते, बोरी प्रकल्पातील ०.१७ टीएमसी पाण्यावर अक्कलकोट व ७ ग्रामपंचायती अवलंबून असून ते दि. २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत, तर पिंपळगाव (दा) प्रकल्पातील ०.०२ टीएमसी पाण्यावर ७ ग्रामपंचायती अवलंबून असून ते केवळ दि. ३१ डिसेंबर २०२६ पुरेल असे त्यांनी सांगितले.

उर्वरित रब्बी हंगामातील अपेक्षित पाणीवापराचा कालावधी ४ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ असा नियोजित करण्यात आला आहे. या कालावधीत बाष्पीभवन व्ययासाठी ४.२८ टीएमसी, जलाशय उपसा सिंचनासाठी ३.२१ टीएमसी, जलाशय बिगर सिंचन (पिण्यासाठी) ०.८२ टीएमसी, जलाशय बिगर सिंचन (औद्योगिक) ०.६० टीएमसी आणि जलाशयातील गाळासाठी ३.८७ टीएमसी पाणी नियोजित आहे. तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या सिंचन आवर्तनासाठी दि. १५ डिसेंबर २०२६ ते १० फेब्रुवारी २०२७ या कालावधीत १.३१ टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सिंचन आवर्तनासाठी याच कालावधीत ०.५७ टीएमसी, कालवा प्रवाही सिंचन आवर्तनासाठी (आष्टी व एकरुख उपसा सिंचन योजनांसह) दि. १ जानेवारी २०२७ ते १५ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ९.५० टीएमसी, तर भीमा-सीना जोड कालव्याच्या सिंचन आवर्तनासाठी (बार्शी, शिरापूर व शिराळा उपसा सिंचन योजना आणि आकस्मिक वापरासह) दि. २५ डिसेंबर २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ४.५३ टीएमसी पाणी नियोजित करण्यात आले आहे. याशिवाय भीमा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी ९.०० टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे उर्वरित रब्बी हंगामासाठी एकूण ३७.६९ टीएमसी पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे.

Previous Post

उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!
मुख्य बातमी

उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

November 5, 2026
सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू
मुख्य बातमी

सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू

November 4, 2026
दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’
मुख्य बातमी

दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’

November 4, 2026
मंत्री जयाभाऊ आणि मुरलीअण्णा आज सोलापुरात करणार हवा…!
मुख्य बातमी

मंत्री जयाभाऊ आणि मुरलीअण्णा आज सोलापुरात करणार हवा…!

November 4, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 5, 2026
उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

November 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026