• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 23, 2026
in इतर घडामोडी
0
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
0
SHARES
53
VIEWS

जागतिक आंतरराष्ट्रीय एकल महिला (विधवा) दिनानिमित्त विशेष उपक्रम

सोलापूर- जागतिक आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात एकल महिलांच्या समस्या, अडचणी व तक्रारी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या.

बैठकीत महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष, वेदना, सामाजिक व आर्थिक अडचणी याविषयी मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. अनेक महिलांच्या समस्या ऐकून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ कार्यवाही करण्यात आली. महिलांचे मनोगत ऐकताना अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपमहापौर देवकर यांनी त्यांना भावनिक आधार देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ कर्तृत्ववान एकल महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला तुळशीचे रोप, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, उपआयुक्त सोनाली यादव, महिला व बालकल्याण अधिकारी अजित खानसोळे, ॲड. रेशमा बिराजदार, शिक्षिका गीतांजली यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांनी विधवा महिलांच्या सन्मान, शिक्षण आणि पुनर्वसनासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. समाजातील उपेक्षित महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी फुले दाम्पत्याने केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान एकल महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने महिलांच्या सन्मानासाठी “विधवा” या शब्दाऐवजी “एकल महिला” हे संबोधन स्वीकारल्याचा उल्लेखही करण्यात आला.

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपले कार्यालय एकल महिलांसाठी सदैव खुले असल्याचे सांगत त्यांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. याच कार्यक्रमात दोन एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यवसाय उभारणीची मदत देण्यात आली. तसेच बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत उपस्थित सर्व एकल महिला भगिनींचे अभिप्राय, सूचना, समस्या व मागण्या यांचा सविस्तर अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करण्यात येणार असून, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली.

एकल महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

Next Post

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026