सिद्धेश्वर कन्या प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न…

0
21

सोलापूर: सिद्धेश्वर कन्या प्रशालेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दहावी बोर्ड परीक्षेत प्रशालेतून प्रथम आलेल्या कु श्रुतिका चव्हाण या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे सदस्य श्री भीमाशंकर पटणे व रिझर्व बँकेच्या व्यवस्थापिका गीतांजली कटारे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका.संगीता गोटे मंदाकिनी मणूरे,पी. एन. कांबळे , शशिकांत मोटगी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा.मुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी केले.

यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या गीतांजली कटारे म्हणाल्या की जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर यश मिळवा . कष्टाने स्वतःच्या पायावर उभे रहा; तेव्हाच स्वतःला स्वतःचे निर्णय घेता येऊ शकतात. जीवनात स्वावलंबी बना. वेळेचा वेळीच सदुपयोग करा.स्वतःच्या मनावर ताबा मिळवा. आपल्या सुप्त मनाची शक्ती ओळखा. असेही यावेळी त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय मनोगतातून भीमाशंकर पटणे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जीवनात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही.त्याला परिश्रमाची जोड द्या तरच तुम्ही स्पर्धेत टिकून राहाल. असा सल्लाही त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. यावेळी श्रुतिका चव्हाण, नेहा दसाडे या विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले. बक्षिसाच्या यादीचे वाचन स्मिता पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्की ए.एन. यांनी केले तर सुनिता मिठारी यांनी आभार मानले.