आय सी एफ (ICF) चेन्नई (इंटिग्रल कोच फॅक्टरी) येथे सुधारित आणि वैशिष्ट्यांसह वंदे भारत ट्रेनची नवीन आवृत्ती तयार करण्यात येत आहे

0
21

अधिक प्रगत सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणेच्या वैशिष्ट्यांसह 25 वंदे भारत ट्रेन प्रगतीपथावर आहेत.

गेल्या वर्षीपासून, आय सी एफ (ICF) चेन्नईने एकूण 2,702 डबे तयार केले आहेत, ज्यात वंदे भारत ट्रेनच्या नवीन आवृत्तीचे 12 डबे आणि रेल्वे बोर्डाने दिलेल्या लक्ष्यानुसार 2,261 एलएचबी (LHB) डब्यांचा समावेश आहे.

आय सी एफ (ICF) येत्या काही वर्षांत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नवीन प्रकारच्या गाड्यांसह सुमारे 30 प्रकारांमध्ये 3,241 कोच तयार करण्याची योजना आखत आहे.

• आय सी एफ (ICF) चालू वर्षात वंदे मेट्रो नावाच्या वंदे भारत ट्रेनची दुसरी आवृत्ती सुरू करेल. ही ट्रेन आंतरशहर कमी अंतराच्या प्रवाशांच्या प्रवासाची पूर्तता करेल आणि प्रवाशांच्या सहज बोर्डिंग आणि डी-बोर्डिंगसाठी दुहेरी उघडणारा दरवाजे असतील.

• वंदे भारत ट्रेनने लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या सार्वजनिक आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी, आय सी एफ (ICF) वंदे भारतची आतील बाजूंसह सुधारित स्लीपर आवृत्ती विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ही चालू वर्षात तयार होईल.

• वंदे भारत प्लॅटफॉर्मवर वेगवान मालवाहतुकीसाठी आय सी एफ (ICF) ने गती शक्ती ट्रेनच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. ही ट्रेन ई-कॉमर्स, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स आणि रेफ्रिजरेटेड वस्तूंसाठी चांगले परिणाम देईल.

• आय सी एफ (ICF) जम्मू आणि काश्मीर प्रदेशासाठी वंदे भारत ट्रेन देखील विकसित करत आहे, ज्यामध्ये कोचमध्ये वातावरण गरम करण्याची सुविधा तसेच पाण्याच्या लाईन्स न गोठण्यासाठीचा समावेश आहे. पुढील वर्षी ही ट्रेन सुरू होणार आहे.

निर्माणाधीन वंदे भारत ट्रेनच्या नवीन आवृत्तीची सुधारित वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-

  • आसनाचा घटणारा कोन वाढेल.
  • उत्तम सीट कुशन
  • मोबाइल चार्जिंग पॉईंटवर पूर्वीपेक्षा चांगली व्यवस्था.
  • एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लास डब्यांमध्ये विस्तारित पायांना विश्रांतीसाठी जागा.
  • पाण्याचा शिडकावा टाळण्यासाठी खोल वॉश बेसिन
  • टॉयलेटमध्ये उत्तम प्रकाशयोजना
    ड्रायव्हिंग ट्रेलर कोचमध्ये वेगळ्या दिव्यांग प्रवाशांद्वारे वापरल्या जाणार्‍या व्हील चेअरसाठी पॉइंट्स निश्चित करण्याची तरतूद.
  • वापरण्यास सुलभतेसाठी रेझिस्टिव्ह टच ते कॅपेसिटिव्ह टच रीडिंग लॅम्प टचिंगमध्ये बदल

उत्तम सुरक्षिततेसाठी वंदे भारत कोचमध्ये रोलर ब्लाइंड फॅब्रिक आणि अँटी क्लाइंबिंग डिव्हाइस.