शरदचंद्र पवार शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

0
19

सोलापूर – येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वर्षी ध्वजारोहण आर्मी , नेव्ही व एयरफोर्स मध्ये काम केलेल्या जवानांच्या मार्फत केले जाते.

या वर्षी मराठा रेजिमेंट मध्ये देशाचे रक्षण करण्यासाठी कारगिल युद्धात सहभागी झालेले सुभेदार मेजर रावसाहेब काशीद , कर्नल एल एन साठे व दहावी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी सनी साळुंखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . मेजर रावसाहेब काशीद व कर्नल साठे यांनी कारगिल युद्धाचे अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम व राष्ट्रप्रेम जागृत केले.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव सपाटे, संचालक ज्ञानेश्वर (आप्पा) सपाटे, मंजुश्री पाटील , रेखाताई सपाटे, सुरेश जाधव , सुरेश सपाटे , हरिदास गायकवाड, दत्ताबुवा शिंदे, प्रवीण सपाटे , प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने ,नवनाथ पाटोळे , सुनीता निकम, सीताबाई गायकवाड व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास शरचंद्र पवार शिक्षण संकुलातील सोळाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अविनाश आलदर यांनी सूत्रसंचालन अमोल मते यांनी तर आभार स्वप्नजा कुंभार यांनी मानले केले.