• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात शिंदे गटाची महापालिकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती

Yes News Marathi by Yes News Marathi
December 28, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापुरात शिंदे गटाची महापालिकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज एक खळबळजनक ‘ट्विस्ट’ पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, दोन्ही पक्षांत जागावाटपावरून बिनसले आहे. परिणामी, शिंदे गटाने भाजपला ‘जय महाराष्ट्र’ करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती जाहीर केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये 51-51 जागांचा समान फॉर्म्युला निश्चित झाला आहे. या नव्या प्रयोगामुळे सोलापूरच्या राजकारणात ‘महायुती’मध्येच मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, निवडणुकीचे सर्व गणिते बदलली आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी या युतीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्ही भाजपसोबत सन्मानजनक युतीसाठी सकारात्मक होतो. आम्ही 40 जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने आम्हाला केवळ 8 जागा देण्याचे कबूल केले. आम्ही किमान २६ जागांवर ठाम होतो, परंतु भाजपने त्यापुढे चर्चा करण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी (अजित पवार गट) हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.”

नव्या युतीचा ‘विकास’ मंत्र

या नव्या युतीमागे सत्तेचे गणितही तितकेच भक्कम असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. “राज्याचे नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे. त्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी आम्हाला निधीची कधीच कमतरता भासणार नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

अशी झाली युतीची खलबते

सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात बोलणी फिसकटल्याने शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्वस्थता होती. दुसरीकडे, अजित पवार गटानेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, काल (२७ डिसेंबर) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर चक्र वेगाने फिरली. भरणे आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब झाले आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सोलापुरात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे

दरम्यान, भाजपने आधीच स्वबळाची तयारी केलेली होती. त्यामुळे शिंदे गटाला कमी जागा देण्यावर ठाम होते, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे अखेर शिंदे गट आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीमुळे सोलापुरात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपला एकाकी पाडण्याच्या या खेळीचा फायदा कोणाला होतो आणि सोलापूरकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

Previous Post

एकनाथ शिंदेंचे सख्खे भाचे आशिष मानेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

सोलापुरात “एसीएस ‘निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स उत्साहात संपन्न

Related Posts

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
Next Post
सोलापुरात “एसीएस ‘निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स उत्साहात संपन्न

सोलापुरात "एसीएस 'निमाकॉन २०२५' राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026