सोलापूर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मनपा सोलापूरच्या महिला आघाडीची महिलादिनी राष्ट्रीय महासचिव म.ज. मोरे व राज्य सरचिटणीस संजय चेळेकर यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षस्थानी सविता जाधवर,सचिव सुनिता वाघमारे, उपाध्यक्ष सुरेखा म्हेत्रे, शैलश्री एंटमनी, सहसचिव मनीषा राऊत, कार्याध्यक्ष रेखा चोपडे, कोषाध्यक्ष रंजना कराळे तर संघटक म्हणून मनीषा क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी बाळासाहेब जगताप यांनी आपले सहकारी अरुण डोके व सिद्धाराम बिराजदार यांच्यासोबत अनेक शिक्षकानी संघात प्रवेश केला. बाळासाहेब जगताप यांची उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.

यावेळी सर्वांना निवड पत्र देण्यात आले व स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे, स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अंकुश कुंभार, मनपाचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, सरचिटणीस नवनाथ माळी, कार्याध्यक्ष प्रदीप सिंह ठाकुर, कोषाध्यक्ष हनुमंत लंगोटे, कार्यालयीन चिटणीस भारत खारे, महिला आघाडी प्रमुख अश्विनी लांबतुरे, प्रसिद्धी प्रमुख अविनाश हिंगणे, शंकर नरहरे, सरचिटणीस सविता पवार, उपाध्यक्ष सविता जाधवर, धोंडू केंगले, सल्लागार संतोष जाधवर, योगेश रंगम, संघटक संगीता जाधव, सविता जाधव, रंजना कराळे, महिला प्रतिनिधी रेखा चोपडे, अश्विनी जवळगे, सुरेखा म्हेत्रे, ज्योती साळुंखे, अर्चना मनअंकलगी उपस्थित होते.












