सांगली मिरजेमध्ये तब्ब्ल १८ तास कोसळधार; जनजीवन विस्कळीत

0
33

सांगली ( सुधीर गोखले) – सांगली मिरज आणि कुपवाड परिसराला पावसाने काल मध्यरात्री पासून अक्षरशः १८ तास झोडपून काढले त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले सर्वत्र पाणीच पाणी आणि रस्ते चिखलमय झाले. मात्र जिल्ह्यामध्ये आटपाडी जत आदी दुष्काळी भागांचे अपवाद वगळता सर्वत्र पाऊसमान चांगले झाले या सततच्या पावसाने हवामानात गारठा निर्माण झाला आहे. सध्या कोयना धरण पायथा विद्युत गृहातून आणि वारणा धरणाच्या सांडव्यातुन तसेच पायथा विद्युत गृहातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कृष्णा नदीपात्रामध्ये पाणी पातळी वाढण्याची भीती होती मात्र ‘अलमट्टी’ मधून १,७५००० क्युसेक्स इतका विसर्ग वाढवल्याने सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी आज एक फूट कमी म्हणजे १८ फुट झाली आहे.


बुधवारी पासून गुरुवारी दुपार पर्यंत मात्र पावसाने चांगलेच झोडपून काढले त्यामुळे शहरामधील मारुती चौक परिसर शिवाजी मंडई चांदणी चौक आदी भागात तर मिरज मार्केट परिसरासह सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी झाले रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वत्र पाणी साचून राहिले रस्त्यावरून जाताना नागरिकांना वाट शोधावी लागली पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.


सांगली मिरजे सह हा पाऊस शिराळा कवठेमहांकाळ वाळवा कडेगाव तालुक्यात बरसला तर जत आणि आटपाडी कडे मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. वारणा धरणातून ६७०० क्युसेक्स विसर्ग सुरु असल्याने वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे,