सोलापूर: २५१,सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निलम नगरला भेट दिली व नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
सोलापूर शहराच्या हद्दवाढीला तब्बल २५ वर्षे उलटली असली, तरी नागरिकांच्या मूलभूत समस्या आजही कायम आहेत. वेळेवर पाणीपुरवठा नाही, व्यवस्थित ड्रेनेज लाईन नाही, सार्वजनिक दिवाबत्तीची गैरसोय, तसेच NA नियम आणि अटींमुळे निर्माण झालेल्या अडचणींना नागरिकांना रोज सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ते केंद्र सरकारपर्यंत सत्ताधारी पक्षांनी सत्ता आणि मंत्रीपदे भोगली, पण नागरिकांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत,पण नागरिकांकडून टॅक्स मात्र वेळेवर वसूल करून घेतात हे अजून किती दिवस ..किंवा किती वर्ष चालणार? याचा आपण विचार करण्याची गरज आहे.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आजवर फक्त आश्वासनचं दिली आहेत निवडून येऊन फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे जनाधाराचा अपमान करून विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना आता आपल्या मतदानरूपी अधिकारातून धडा शिकविण्यासाठी यंदा परिवर्तन घडवा व येत्या 20 नोव्हेंबर रोजी माझ्या अनुक्रमांक “१२” समोरील “गॅस सिलेंडर” या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या असं आव्हान नागरिकांना केलं.