• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला – आनंद चंदनशिवे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2024
in इतर घडामोडी
0
आ.देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला – आनंद चंदनशिवे
0
SHARES
1
VIEWS

सुशील कुमार शिंदे यांनी उजनी येथून पाईपलाईन आणून पन्नास वर्षे सोलापूर वर अधिराज्य गाजवलं. आमदार देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.सत्ता मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी सात वर्षात हजारो कोटींचा निधी यासाठी आणला. दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ३५ वर्ष ज्यांनी वापरला ज्यांनी महापालिका ओरबाडून खाल्ली असा सवाल कोठे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यापारी मेळाव्यात उपस्थित केला..

भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी माहितीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी सम्राट चौकातील महेश गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर राम वल्लभ जाजू, कैलास कोठारी, अभय सुराणा, इंदरमल जैन,पुरुषोत्तम धुत, ब्रिजमोहन फोफ्लिया,निलेश भंडारी, केतन शहा, गुंडू शर्मा, दीपक मुनोत, आनंद शर्मा,चेतन पाटील,जयचंद्र वेद, सुहास कदम, अशोक चव्हाण, अमर पुदाले,जुमलजी करावा, श्रीनिवास दायमा, रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना चंदनशिवे म्हणाले की शहर उत्तर मध्ये भाजपच्या विचारधारा असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमदार देशमुख हे विक्रमी मतांनी निवडून येतील. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी मध्ये मालक शपथ घेतील हे आम्हाला पाहायचा आहे. शहरातील व्यापाऱ्यांना हवे तेव्हा पाहिजे ती मदत मालकांनी वेळोवेळी केली आहे. वेळप्रसंगी कामात हाय काय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास ही सांगितले. मागील पंधरा वर्षापासून मी महानगरपालिकेच्या सभागृहात साक्षीदार आहे. देशमुख मालकांनी भाजपची सत्ता आल्यावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून सांगितले जनतेसाठी काम करा, कोणतेही चुकीच्या कामांना पाठीशी घालू नका. पैशाच्या मोहात पडू नका चांगले काम करा नाव कमवा. मी तुम्हाला पैसे देतो. स्टॅंडिंग सभागृह महापौर पदाच्या कार्यकाळात कोणतेही आर्थिक विषयाच्या मागे लागू नका असा सांगणारा आमदार मी जवळून पाहिला आहे. टक्केवारी न घेणारा आमदार म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.मागील २० वर्षात २५ हजार पेक्षा रुग्णांवर हृदयाचे ऑपरेशन कॅन्सरच्या उपचारासाठी आणि डोळ्यांचे ऑपरेशन मालकांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत घडवून आणले. आमदार देशमुखांनी कधी कामाची प्रसिद्धी केली नाही त्यांना ते आवडतही नाही. हाथी चलता है,कुत्ते भोगते है, या उक्तीप्रमाणे मालकांनी प्रसिद्धीच्या मागे लागून स्वतःचं कौतुक करून घेतल नाही. मालकांना जा विचारणाऱ्यांनी तुम्ही कधी कुठल्या गरीबाचा दवाखान्याचा खर्च केलात का ? कुठल्या गरिबाला ऑपरेशन साठी मदत केलीत का ? उजनी वरून येणारी दुहेरी पाईपलाईनचे काम ९०% झाला असून थोड्या दिवसातच काम पूर्ण होऊन शहराचे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. याचाही गवगवा कधी आमदार देशमुखांनी केला नाही. ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता ३५ वर्ष होती, दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ज्यांच्या हातात होता, ज्यांनी महापालिका ओरबडून खाल्ली त्यांनी स्वतः काय केलं याचा आधी हिशोब द्यावा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली…

मेळाव्यामध्ये उत्तर देताना आमदार देशमुख म्हणाले की पुढील पाच वर्षात सम्राट चौक परिसराला छत्रपती संभाजी महाराज चौकाप्रमाणे सुशोभीकरण करू या भागातील राहिलेले नागरिक समस्यांची पूर्तता करू. स्मार्ट सिटी मुळे अनेक चांगली कामेही झाली आहेत. सोलापूरच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईन चा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हजार कोटीचा निधी आणला आणि आता ते काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल. पक्षाने मला माहिती मधून पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे तुम्ही सर्व जनता माझ्या पाठीशी असल्याने ही संधी मला पुन्हा मिळाली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माग तुमची साथ अशीच राहू द्या राज्यात माहितीच सरकार येण्यासाठी आपण आम्हाला मतदान करावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी यावेळी केले….

या कार्यक्रमास शहरातील व्यापारी वर्ग रेडीमेड कारखानदार कापड व्यापारी टेक्सटाईल व्यापारी इत्यादी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी होम मैदानावर जाहीर सभा

Next Post

दक्षिणचे उमेदवार संतोष पवार यांनी जाणुन घेतल्या निलम नगर इथल्या अडचणी

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
दक्षिणचे उमेदवार संतोष पवार यांनी जाणुन घेतल्या निलम नगर इथल्या अडचणी

दक्षिणचे उमेदवार संतोष पवार यांनी जाणुन घेतल्या निलम नगर इथल्या अडचणी

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026