सोलापूर :- महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा – २०२३” या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी सोलापूर, मोहोळ आणि पंढरपूर या केंद्रावर करण्यात आले होते. या परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती बुद्धजय भालशंकर यांनी दिली.
भारतीय संविधान आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे सामाजिक कार्य या विषयावर ही परीक्षा घेण्यात आली होती.परीक्षेच्या यशस्वीतेसाठी आशुतोष तोंडसे, राहुल साखरे, प्रा. पी. एस.शिंदे,महादेव कांबळे, सत्यवान पाचकुडवे, पांडुरंग दराणे यांनी परिश्रम घेतले.