रोहितदादा पवार चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत केपीसीसीची फायनलमध्ये धडक, उद्या होणार उपांत्य अन् अंतिम सामना…

0
20
  • सोलापूर – येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरील हिरवी गारखेळपट्टी असलेल्या मैदानावर “रोप” फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादीचे युवा शिलेदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज केपी संघाने स्टार संघावर सांघिक खेळाच्या जोरावर मात केली. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ‘अ’ संघाने सामनावीर पृथ्वीराज मिसाळ च्या नाबाद अर्धशतक मुळे आणि प्रवीण देशेट्टी च्या गोलंदाजी ने पंढरपूरच्या वीर सावरकर क्लबचा 68 धावांनी पराभव करत उद्याच्या उपांत्य सामन्यात प्रवेश केला.
  • दुपारच्या सत्रात स्टार संघाचा मुकाबला युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या केपी संघासोबत झाला, यात कालचा हिरो सुदेश राठोड लवकर बाद झाला तरी सलामीचा फलंदाज विवेक अनचीने आपली नाबाद अर्धशतकी खेळी खेळताना कर्णधार वैष्णव जावळेसोबत 68 धावांची भागीदारी करत स्पर्धेतील सलग चौथ्या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. स्टार संघाने सुरूवात चांगली केली होती, कर्णधार झैद उस्तादने पुन्हा एकदा 42 धावांचे योगदान दिले पण मधल्या फळीतील फलंदाज सुरज गायकवाडचे गोलंदाजी समोर टिकू शकले नाहीत.
  • पहिला सामना संक्षिप्त धावफलक :- – साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ‘अ’ विरुद्ध वीर सावरकर पंढरपूर. साऊथ सोलापूर आपटे ग्रुप :- 171/5 (18 षटके) पृथ्वीराज मिसाळ नाबाद 65, आदर्श मनुरे 30 धावा, प्रवीण देशेट्टी 24 धावा, ओंकार रोकडे 35/2 बळी, दिनेश शिंगाडे व सागर खिलारे प्रत्येकी एक बळी. वीर सावरकर पंढरपूर 103/8 (18 षटके) : अथर्व देशमाने 18. चिन्मय शेट्टी 16, रोहित जोशी, ओंकार भांबुरे व प्रवीण देशेट्टी प्रत्येकी 2 बळी
  • दुसरा सामना संक्षिप्त धावफलक :- स्टार क्रिकेट क्लब विरुद्ध केपीसीसी, स्टार क्रिकेट क्लब :- सर्व बाद 124 धावा (20 षटके), झैद उस्ताद 42, समीर शेख, असिफ शेख प्रत्येकी 17, सुरज गायकवाड 26/4 बळी, सोहेल काझी 25/3 बळी. केपसीसी:- 125/2 (14.5 षटके), विवेक अनची नाबाद 72 (58 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार), सुदेश राठोड 20, महेश अरकाल 18/1 बळी
  • उद्या उपांत्य सामना साऊथ सोलापूर ‘अ’ विरुद्ध पुष्प अकॅडमी या संघात तर दुपारी अंतिम सामना – सकाळच्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध केपी सीसी असा रंगणार आहे.