सोलापूरच्या गड्डा यात्रेमध्ये दोन गटाच्या मारामारीत एका व्यक्तीचा खून

0
45

सोलापूर : गड्डा यात्रेत भर दिवसा एकाचा खून झाला असून किरकोळ वादातून विक्रेते एकमेकांत भिडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. भर दिवसा आणि गड्ड्यावर हा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डायात्रा सुरू आहे, या यात्रेमध्ये वेगवेगळ्या वस्तू विक्री करण्यासाठी इतर राज्यातून अनेक कुटुंबीय आणि परप्रांतीय येतात. यात शेजारी-शेजारी बसलेल्या दोन गटांमध्ये गुरुवारी दुपारी वाद झाला आणि हा वाद थेट जिवे मारण्यापर्यंत गेला. यात एकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे.

पैशांच्या देण्याघेण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन सदरची घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी फौजदार चावडी व सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा करून लादेन यांच्या रुग्णवाहिकेमध्ये देह घालून शवविच्छेदनसाठी सिव्हील हॉस्पिटलकडे हलविण्यात आला. पोलीस घटनेचा तपास असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. मयत आणि जखमींची नावे अद्यापही समोर आलेली नाहीत.