सोलापूर शहरातील अवंती नगर येथील अरविंद धाम पोलीस वसाहत गेट ते येस न्यूज मराठी कार्यालय ते वाघमोडे यांच्या घरापर्यंत चा रस्ता खासदार प्रणिती शिंदे यांच्या १० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आला. या रस्त्याचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की शहर उत्तर मध्ये यापूर्वी कोणी येत नव्हते ..कोणी काम करत नव्हते मात्र मी आता खासदार झाल्यामुळे मला कधीही कुणी कामे सांगावी मी कुठेही काम करायला तयार आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही काम करून संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लोकांनी यासाठी साथ द्यावी असे आवाहन.त्यांनी यावेळी केले . काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी या परिसरातील नागरिक उपस्थित होते.



