• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणार..

by Yes News Marathi
January 7, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणार..
0
SHARES
235
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदांवर भरती करण्याचा आदेश सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून ही नियुक्ती होणार आहे.सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे ठेवण्यात आली असून प्रति महिना 20 हजार रुपयांचा मानधन देण्यात येणार आहे.

या नियुक्ती करिता जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करण्यात येणार आहे. नियुक्तीच्या कालावधीतील करार पद्धतीने शिक्षकीय पदांचे विहित काम पूर्ण करण्याचे जबाबदारी संबंधित शिक्षकावर ठेवण्यात आली आहे. या आशयाचे बंद पत्र, हमीपत्र घेण्यात येणार आहे. ही नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेणे बाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागून नियुक्ती आदेश देण्यात यावे, तसेच संबंधित शाळेतील रिक्त शिक्षक या पदांची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. ही नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल, अशा नियम व अटी सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आदेश काढला आहे.

Previous Post

राष्ट्रमाता इंदिरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत मिळाली नोकरी

Next Post

एकीकडे ‘गड्डा यात्रा’ दुसरीकडे निवडणुकीची ‘जत्रा’ भरणार..!

Next Post
एकीकडे ‘गड्डा यात्रा’ दुसरीकडे निवडणुकीची ‘जत्रा’ भरणार..!

एकीकडे 'गड्डा यात्रा' दुसरीकडे निवडणुकीची 'जत्रा' भरणार..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In