• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे: मानाच्या गणपतीेची झाली विधीवत प्राणप्रतिष्ठापना

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2021
in इतर घडामोडी
0
पुणे: मानाच्या गणपतीेची झाली विधीवत प्राणप्रतिष्ठापना
0
SHARES
1
VIEWS

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता येत आहे. पाहुयात पाच मानाचे गणपती प्राणप्रतिष्ठापना …
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे आगमनाचे भाविक आतूरतेने वाट बघत असतात. या पाचही बाप्पांची कोरोनाचे नियम पाळून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीचे आगमन झाले असून, विधीवत प्राणप्रतीष्ठापना देखील झाली आहे. यंदा करोनाचे सावट संपूर्ण पणे टळले नसल्याने पुण्यात या वर्षी देखील पोलिसांच्या बंदोबस्तात साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कार्यकर्ता आणि गणेश भक्त यांच्यातील दुव्याचे कार्य करत असताना डिजिटल गणपती मंडळ आणि बाप्पाचा कार्यकर्ता हे विविध उपक्रम घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कसबा गणपती
शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली होती. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाली आहे. त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली. मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शन आणि लाईव्ह कार्यक्रम पाहता येत आहे.
तांबडी जोगेश्वरी गणपती
लोकमान्य टिळक यांनी श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीस मानाचा दुसरा क्रमांक दिला हे सर्वश्रुत आहे. सन १८९३ सालापासून मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने तसेच शिस्तबद्ध स्वरूपात साजरा केला जातो. श्रींची उत्सवमूर्ती दरवर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीत नवीन बनवली जाते. शास्त्रविधीप्रमाणे पंचगव्य, गणेशप्रिय दुर्वा यासह तयार होणारी ही मंगलमूर्ती म्हणूनच भक्तवत्सल, भक्तप्रिय आहे. जुन्या काळातील गंजिफाच्या खेळात निरनिराळ्या चित्रात असलेले जे हत्तीचे चित्र आहे, त्या चित्राप्रमाणेच म्हणजेच आफ्रिकन हत्तीच्या चेहऱ्याप्रमाणे पूर्ण चेहरा असलेले मुख हे या मूर्तीचे वैशिष्ठ्य आहे. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते आणि सनई-चौघडा च्या सुरावटीत झाली आहे.
तुळशीबाग गणपती
श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली.
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते झाली आहे. मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे. गणेश याग मंत्रजागर असे धार्मिक विधींसह बाप्पांचे स्वागत करण्यात आले आहे.

Previous Post

पंतप्रधान मोदी म्हणाले, गणपती बाप्पा मोरया

Next Post

आजची काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी – शरद पवार

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
आजची काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी – शरद पवार

आजची काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी – शरद पवार

ताज्या बातम्या

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

August 19, 2026
एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026