• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

Yes News Marathi by Yes News Marathi
September 1, 2026
in Blog
0
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते
0
SHARES
4
VIEWS

पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी पुणे जिल्ह्यात तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून ६६२ किलोमीटर लांबीचे रस्ते नव्याने तयार करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकल्पाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत निर्देश दिले आहेत. रस्त्यांच्या कामांना १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरुवात करून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे मोठे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

या महत्त्वाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट कारवाई करून त्यांना तत्काळ काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात येईल, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे.

पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या पर्वामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ४३७ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ११ तालुक्यांमध्ये आणखी ६६२ किलोमीटरचे रस्ते नव्याने विकसित केले जातील. यातून दोन्ही पर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण १ हजार ९९ किलोमीटरचे दर्जेदार रस्ते तयार होणार आहेत. या दुसऱ्या पर्वातील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुमारे ३६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत आणि योग्य मानांकनानुसारच पूर्ण झाली पाहिजेत. कामांच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण चाचण्या घ्याव्यात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा, रस्त्याची जाडी, डांबरीकरण तसेच आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजनांची नियमित तपासणी करावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखविणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

Next Post

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!
Blog

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश
Blog

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
Blog

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
Next Post
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026