उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील दादागिरी व भाईगिरीने पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याची भावना जनतेमधून उमटत आहे.बीड हत्याकांड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट पडलेली असतानाच आता सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व वक्फ खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा दिली आहे.
यामुळे त्यांची आमदारकीही तात्काळ प्रभावाने आपोआप रद्द झाली आहे. दादांच्या राष्ट्रवादी पक्षातील या दुसऱ्या मंत्र्याची विकेट उडाली असून समाजातील पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.बीड हत्याकांड प्रश्नी अद्यापही धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि अशात अजित पवार यांनी कोकाटे यांना मंत्रीपदी कायम ठेवले तर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ शकते. आता बिन खात्याचे मंत्री असलेल्या कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

