राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; 18 जुलै रोजी होणार मतदान

0
17

येस न्युज नेटवर्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 15 जून ते 29 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 2 जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी देशातील सर्व राज्यांचा दौरा करू शकतात. संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात.