• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2026
in इतर घडामोडी
0
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
0
SHARES
10
VIEWS

मुंबई दि. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणुक 2026 चा निकाल आज मुंबई येथे जाहीर करण्यात आला व त्यामध्ये सोलापुरचे जेष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या सदस्य पदाकरिता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीस उभारलेल्या एकूण 155 उमेदवारांपैकी 18 पुरूष व 5 महिला सदस्यांच्या निवडीकरिता पसंतीक्रमाने सुमारे एक लाख वकिलांनी दि. 24 मार्च रोजी मतदान केले होते. ॲड.मिलिंद थोबडे यांनी पहिल्या पसंतीची 3829 मते मिळवुन पाचव्या स्थानी निवडुन आल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. अजय नाथानी यांनी जाहीर केले

   यापूर्वी सन 2010 व 2019 मधे झालेल्या बार कौन्सिलच्या निवडणुकीत ॲड.मिलिंद थोबडे यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला होता व यंदाच्या निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. ॲड.मिलिंद थोबडे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सन 2011 व 2022 मधे अध्यक्षपद भूषविले.

      ॲड.मिलिंद थोबडे यांनी आय.एल.एस लॉ कॉलेज मधून 1983 साली एलएलबी पदवी घेऊन ज्येष्ठ विधिज्ञ काकासाहेब थोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायास सुरुवात केली. ॲड.मिलिंद थोबडे यांनी 1992 साली सोलापूर बार असोसिएशनचे सचिव पद तर 2005 साली अध्यक्षपद भूषविले आहे.

ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपल्या कार्यकाळात गोवा येथे बार कौन्सिल च्या कार्यालयाची स्थापना, राज्यस्तरीय कार्यशाळांचे यशस्वी आयोजन, विमा योजना अमलात आणणे, मेडिक्लेम योजनेच्या माध्यमाने वकिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, महिला मेळाव्यांचे आयोजन, मृत वकिलांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळवुन देणे, नवोदित वकिलांना लॅपटॉप व कायदेविषयक पुस्तकांचे विनामूल्य वितरण करणे अशा व विविध उपक्रम राबवून सतत गरजु वकिलांना सहाय्य केले आहे
 ॲड.मिलिंद थोबडे यांनी सन 2022 मधे काकासाहेब थोबडे फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातुन देखील विद्यार्थ्यांकरिता राज्यव्यापी मुटकोर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वकिलीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या वकिलांना आवश्यक पुस्तकांचे विनामूल्य वाटप करून त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. 

   ॲड.मिलिंद थोबडे यांनी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळीत यांचा भव्य सत्कार समारंभ व कार्यशाळेचे आयोजन देखील केले आहे. 
   ॲड.मिलिंद थोबडे यांनी सक्षम नवोदित वकील घडवण्यासाठी व समस्त वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे व वकील संरक्षण कायदा पारित होण्याकरीता शासनाकडे बार कौन्सिलच्या माध्यमातुन पाठपुरावा करणार असल्याचा मानस व्यक्त करून त्यांना पुनःश्च निवडुन दिल्याबद्दल सर्व वकिलांचे आभार मानले.

    निवडणुक लढवणारे सोलापुर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारापैकी ॲड. असीम बांगी, ॲड. संतोष न्हावकर, ॲड. प्रदीपसिंग राजपूत, ॲड. धनश्री घाडगे, ॲड. महेश कसबे व ॲड. हेमा शिंदे हे पराभूत झालेले आहेत.
Previous Post

बहिणीला पोटगी नाकारणाऱ्या भावजीच्या खुनाच्या आरोपातून मेव्हण्यासह दोघे निर्दोष

Next Post

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

Related Posts

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
Next Post
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026